पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आलं आहे. हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आलं आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आलं असून अलिकडेच सरकारच्या ट्विटर अकाउंटवरून पीएफआय (PFI) बंदीच्या विरोधात ट्वीट करण्यात आलं होतं. त्यामुळेच ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे.