इंडिया आघाडीने 14 सदस्यीय समन्वय पॅनेलची घोषणा केली. या पॅनेलवरील सर्व सदस्य वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. बैठकीत सहभागी झालेल्या 28 पक्षांनी पुढील लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. यावेळी सर्वांनी महत्त्वाच्या आणि चिंतेच्या मुद्द्यांवर भाष्य करत, देशाच्या कानाकोपर्यात एकत्र रॅली काढनार असल्याचे संगितले. जागावाटपाच्या वादग्रस्त मुद्द्यावर लवकरात लवकर निष्कर्ष काढण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचे बोलण्यात आले.
या समन्वय पॅनेलमध्ये केसी वेणुगोपाल (INC), शरद पवार (राष्ट्रवादी), टी आर बाळू (डीएमके), एमके स्टॅलिन (डीएमके), संजय राऊत (एसएस), तेजस्वी यादव (RJD), अभिषेक बॅनर्जी (TMC), राघव चड्डा (आप), जावेद अली खान (एसपी), लल्लन सिंग जेडीयू, हेमंत सोरेन (JMM), डी राजा (सीपीआय), ओमान अब्दुल्ला (NC), मेहबूबा मुफ्ती (PDP) आदि नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर पुन्हा तोफ डागली. सोबतच इंडिया आघाडी, भारतातील 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवणे भाजपला अशक्य आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले. देशातील भीतीचे वातावरण संपवण्याचा निर्धार आम्ही केला आहे असे शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्राच्या निर्णयावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, ‘पांच साल लुट, चुनाव के समय छुट’ हे या सरकारचे ध्येय आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आम्ही महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर लढणार आहोत. पंतप्रधान मोदी हे श्रीमंतांची बाजू घेत गरीबांना लुटण्याचं काम करत आहेत. यावेळी सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर केल्याच्या आरोपाचा काँग्रेस अध्यक्षांनी पुनरुच्चार केला. सध्याच्या सरकारकडून या केंद्रीय संस्थांचा ज्या प्रकारे गैरवापर केला जात आहे तो अभूतपूर्व आहे, असे खरगे म्हणाले. आज सत्तेत असलेल्यांचा पराभव होईल असा विश्वास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.