अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामधील बटलर शहरामध्ये शनिवारी 13 जून रोजी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प हे भाषणासाठी उभे राहिले असता त्यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला. यावेळी सुरक्षारक्षकांनी बंदुकांची तोंडं समोरील दिशेने करत अवघ्या काही सेकंदात डोनाल्ड ट्रम्प यांना गराडा घालून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. बटलर हे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामधील १३ हजार लोकांचे वास्तव्य असलेले शहर आहे. 2016 मध्ये ट्रम्प यांना अध्यक्ष बनवण्यात या शहरानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
अमेरिकेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 13 जुलैला बटलर शहरामध्ये संध्याकाळी 6 च्या सुमारास रिपब्लिकन पक्षाची प्रचार सभा सुरू होती. एका खुल्या पटांगणावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात होता. संध्याकाळी 6 च्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प हे भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी भाषणास सुरूवात केली. अमेरिकेत बेकायदेशीररित्या आलेल्या परदेशी नागरिकांबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणांवर टीका करत असताना अचानक बांधकाम सुरू असलेल्या एक इमारतीच्या छतावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने 5 गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली आणि ट्रम्प यांच्या कानाजवळून रक्त वाहू लागले. डोनाल्ड ट्रम्प हे खाली वाकताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं. आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्नायपरने शूटरने हल्लेखोराला 200 मी वरून निशाणा साधत जागीच ठार केले.अशा परिस्थितीमध्ये देखील ट्रम्प यांनी गर्दीच्या दिशेने हवेत मुठ उंचावत आणि “लढा” म्हणत जनतेला आवाहन केलं.
माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स असून तो बेथेल पार्क पेनसिल्व्हेनियातील रहिवासी असून, थॉमस मॅथ्यू क्रूक्स या 20 वर्षीय तरुणाने ट्रम्प यांच्यावर गोळी चालवली. त्याची ओळख पटली असून, सभेच्या ठिकाणापासून, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर हा हल्लेखोर लपून बसला होता. परंतु, हल्ला होताच स्नानयपरने त्याच्यावर केलेल्या गोळीबारात एक गोळी थेट हल्लेखोराच्या डोक्यात घुसली आणि तो जागीच ठार झाला. या घटनेसंबंधी, बीव्हर काउंटीचे उपाध्यक्ष रिको एलमोर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सभेवेळी खास पाहुण्यांच्या जागी रिको एलमोर बसलेले असताना त्यांना गोळीबाराचा आवाज आला. त्याठिकाणी गोंधळ झाला व यात काहीजण जखमी झाले. बॅरीगेट ओलांडून ते जखमी व्यक्ती जवळ गेलास त्याचा कपाळात गोळी घुसल्याने त्याचा मृत्यू झाला होता आणि अन्य दोनजण जखमी झाल्याचे समजले. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे आता सुरक्षित असून, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली याप्रकरणाची चौकशी होणार आहे या हल्ल्यातील हल्लेखोर मारला गेल्याने याप्रकरणाचा तपास लागण्याकरता कदाचित काही महिने किंवा वर्ष लागू शकतील अशी शक्यता वर्तवली जातेय.