मुंबई | ‘द कपिल शर्मा शो’ सर्वांच्या आवडीचा ठरत आहे. या शोचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. या शोमधील अर्चना पूरन सिंह यांची बातमी समोर आली आहे. अर्चना यांनी शोमध्येच दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याकडे काम न दिल्याची तक्रार केली आहे. ‘बोल बच्चन’ सिनेमानंतर मला काम देणे बंद केल्याचे अर्चना यांनी म्हटले आहे.
अर्चना पूरन सिंह या ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये पर्मनंट गेस्ट आहेत. जेव्हा रोहित शेट्टी या शोमध्ये आले त्यावेळी अर्चना यांनी काम न दिल्याची तक्रार केली. अर्चना यांनी म्हटले की, ‘बोल बच्चन’ सिनेमानंतर मला काम देणे बंद केले. त्यावर रोहित शेट्टी देखील लगेचच उत्तर देतात. ते म्हणतात की, ‘रणवीर सिंहच्या आईच्या भूमिकेसाठी मी तुमच्या नावावर विचार केला होता’.
त्यावर कपिल शर्मा चांगलीच गंमत करतो आणि ‘त्यांना अभिनेत्रीची भूमिका करायची आहे’, असे म्हणतो. कपिल शर्माची ही कमेंट ऐकून तेथे उपस्थित असलेले प्रेक्षक आणि पाहुणे कलाकार हसू लागतात.