मुंबई | काहीही करुन मेळाव्याला गर्दी जमवायची अन् बीकेसीचं मैदान भरवायचं, असा चंगच एकनाथ शिंदे गटाने बांधला आहे. जवळपास साडे चार हजार गाड्या बुक करुनही मैदान भरत नाही म्हटल्यावर आता परप्रांतिय लोकांनाही शिंदे गटाने मेळाव्याला आणलं आहे. बरं त्या लोकांना आपण कुठे जातोय, कुणाच्या मेळाव्याला जातोय, तो मेळावा कुठे आहे? हे देखील माहिती नाहीये.
पुण्याहून शिंदे गटाची एक गाडी मुंबईला निघालेली असताना आमच्या प्रतिनिधीनी काही प्रश्न विचारले असता. लोकांना काहीच माहिती नसल्याने त्यांची बोबडी वळली. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मजुरांना गाडीत बसवून मुंबईला आणण्यात येतंय. मेला आहे म्हणून आम्हाला सांगितलं गेलंय. गाडीही फ्री आहे, पण जायचंय कुठे माहिती नाही, अशी माहिती एका व्यक्तीने ‘मटा’च्या प्रतिनिधीला दिली.