पुणे | माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गंगाधाम येथील आशापुरा माता मंदिरात बुधवारी (दि.26) पहाटे पाच ते सकाळी साडेसातच्या दरम्यान होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर आणि सहकलाकारांच्या संगीत व गाण्यांची मैफिल होणार आहे, अशी माहिती माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली आहे.
ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पाडवा पहाट या कार्यक्रमात तब्बल 3500 पणत्यांद्वारे दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. पहाटे पाच वाजता ‘फायर शो’ होणार आहे. तसेच पहाटे पाच वाजण्यापूर्वी सहपरिवार उपस्थित राहणाऱ्या कुटुंबाला पाडव्याच्या शुभ दिवशी माताच्या मंदिराचा दरवाजा उघडण्याचा लाभ मिळणार असून, त्यासाठी लकी ड्रॉ काढला जाणार आहे. ‘लकी ड्रॉ’साठी पहाटे साडेचार ते पाचपूर्वी कुटुंबासमवेत उपस्थित राहावे लागणार आहे.
अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा…
– पहाटे 5.05 ते 5.20
आशापुरा माताजी, महालक्ष्मी माताजी, अंबा माताजी, गणेशजी महाराज, सच्चाई माता, पद्मावती माता, श्री सोनाणा खेतलाजी यांची आरती 5 भाग्यवान कुटुंबाला मिळणार आहे.– 5.20 ते 5.30
परिवारासह मंदिर परिसरात दीप प्रज्वलन होणार आहे.– 5.30 ते 5.45
रंगेबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी (समितीकडून दिव्यांचे पॅकेट मंदिरात उपलब्ध असेल)– 5.45 ते 7.45
सुप्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर यांच्यासह सहकाऱ्यांचे गायन– सकाळी 7.45
प्रसाद वाटप