पुणे | आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील लाखोंचा जनसागर, अनेक मान्यवर, पदाधिकारी पुणे स्टेशन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एकवटले. तसेच लोकसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून भव्य एकता मिसळचं देखील आयोजन याठिकाणी करण्यात आलं.
तब्बल ६ हजार किलोची ही मिसळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी केली होती. उन्हाच्या तडाख्यात या मिसळ सोबतच थंडगार ताक देखील उपस्थित नागरिकांना देण्यात आले. लाखोंच्या संख्येत या ठिकाणी नागरिक विविध ठिकाणांहून आले होते.
दरम्यान, दि. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीला देखील महात्मा फुले वाडा येथे ५००० किलोची एकता मिसळ करण्यात आली होती. यामध्ये देखील विविध पक्षाच्या नेत्यांनी आपला मतभेद बाजूला सारून एकता मिसळचा आस्वाद घेतला.