मुंबई | शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पक्षातील 40 आमदारांसह गुवाहाटीला असल्याचे समोर आले होते. या सर्व घडामोडीनंतर राज्यात मोठं राजकीय नाट्य घडले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत.
राज्यातील विविध राजकीय नेत्यांकडून मध्यावधी निवडणुका होणार असल्याची विधाने केली जात आहेत. त्यात आता येत्या 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. सत्तानाट्यात महाराष्ट्रात परत येताना एकनाथ शिंदेंसह सगळे आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा दौरा होणार असल्याची चर्चा होती. पण आता या दौऱ्याची तारीख ठरली आहे.