मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कामांच्या स्थगितीवरून आक्षेप घेतला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही सात-सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो”.
विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच अजित पवार यांनी राज्यातील विकासकामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ”तुम्ही सात-सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा आमची सगळी विकासकामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं”.
दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार वेलमध्ये उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. स्थगिती सरकार हाय हाय. 50 खोके एकदम ओके”, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या.