भाजपाकडून मोहोळ, मुळीक की काकडे ?
पुणे । पुणे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी सलग विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. 2014 मध्ये अनिल शिरोळे आणि 2019 मध्ये गिरीश बापट प्रचंड मताधिक्यानं म्हणजे तीन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले. या दोन्ही भाजपाच्या उमेदवारांना खासदार म्हणून निवडून देणारे पुणेकर आता 2024 मध्ये कुणाला खासदार करतील…? मोदी सरकारच्या दोन टर्मनंतर पुणेकर पुन्हा भाजपाचाच उमेदवार निवडून देतील की, महाविकास आघाडीचा उमेदवाराला संधी देतील…? महाविकास आघाडीचं आव्हान परतवून लावण्याची ताकद भाजपाच्या कोणत्या इच्छुक उमेदवारामध्ये आहे… अशा अनेक प्रश्नांवरून सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याच अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहोत…
भाजपाकडून उमेदवारी मिळावी म्हणून हे चारही नेते आपापल्या परीनं फिल्डिंग लावून आहेत. उमेदवारी माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच समजेल परंतु, जसं वरिष्ठांकडून जाहीर करण्यात आलं तसं निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ भाजपा टाकणार का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. निवडून येण्याची क्षमता नसलेल्या आणि केवळ वरिष्ठ नेत्याची मर्जी असलेल्या नेत्याला भाजपानं पुणे लोकसभेची उमेदवारी दिली तर, महाविकास आघाडीचं आव्हान पेलणं भाजपाला अवघड जाईल. पुन्हा कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाची पूनरावृत्ती नको असेल तर, भाजपाचे वरिष्ठ नेते योग्य त्या उमेदवाराला उमेदवारी देतील अशी अपेक्षा भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.