नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आणि महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे निवडून आले. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटून क्रॉस व्होटिंग झाल्यानं जयंत पाटील यांचा पराभव झाल्याच सांगितलं गेलं. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठा गौप्यस्पोट केला की, विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही एक सापळा रचला होता. ज्यामध्ये पक्षातील काही फुटीर आमदार सापडल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. परंतु, आता महायुतीचे क्रॉस व्होटिंग केलेले आमदार फडणवीसांना भेटल्याचा मोठा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या घरी आमदारांची बैठक झाली.विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग केलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आमदारांवरील कारवाई नंतर त्यांनासोबत घेण्याबाबत ठरवू असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
याबाबत, काँगेसमधील फुटीर आमदारांवर येत्या शुक्रवारी 19 जुलै रोजी निर्णय घेण्यात येणार असून मुंबईच्या काँग्रेस कार्यकारणीची यासंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते तसेच दिल्लीमधून के.सी. वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्निथला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आमदारांनी पक्षाच्या आदेशाच्या विरोधात व्होटिंग केल्यामुळे फुटीर आमदारांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आहे . यापूर्वीची काँग्रेसची पद्धत होती शिस्त भंगाची कारवाई अनेक महिने होत नव्हती परंतु आता काँग्रेस एक्शन मोडवर आहे. आता काँग्रेस ने या आमदारांना 6 वर्षांसाठी निलंबित केल्यास भाजप कडून काय पाउल उचलले जातात ते पाहणं महत्वाच ठरणार आहे.