लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिला. आता आगामी विधानसभा निवडणुकीवर महाविकास आघाडीने लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवून त्यातील जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवता यावा यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करतीये. यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन पक्षात जागा वाटप करण्याविषयी ठरलं असल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे काँग्रेस पक्ष काय भूमिका घेते याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे काँग्रेस किती जागा लढवणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ९५ ते १०० जागा लढवतील अशी शक्यता आहे.
महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. यामुळे जागावाटपात थोड्या प्रमाणात संघर्ष होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटप करताना काँग्रेसने मोठी भूमिका पार पाडली. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष ठरला. लोकसभा निवडणुकीमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरल्याने विधानसभेसाठी कशाप्रकारे जागावाटप करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. महाविकास आघाडीमध्ये आपल्याला अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस देखील प्रयत्न करणार पण महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे यासाठी सहमत होतील का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.