बीड : येत्या विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. बीड मध्ये कार्यकर्त्यांशी बोलत असताना, खासदार प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचा मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा आहे मात्र, ओबीसीच ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजासाठीच ताट वेगळं असलं पाहिजे. त्याचबरोबर बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेवर देखील प्रकाश आंबेडकरांनी संशय व्यक्त करत, मराठा आरक्षणाबाबत ५५ लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप तसेच सगे सोयरेंच्या अंमलबजावणीला विरोध ही दर्शवला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवारांनी विधानसभेत आम्ही 225 समाजाचे आमदार निवडून येतीलअसे म्हटले आणि त्यानंतरच वातावरण चिघळलं. असा आरोप करत त्यात लोकसभेत महाविकास आघाडीचे वागणं बघितल्यानंतर ते मराठा समाजाशिवाय दुसरं कोणालाच आणणार नाहीत असंच चित्र दिसत आहे. त्याच्यामुळे ओबीसीची जी जातनियाहाय जनगणनेची मागणी आहे तीच पद्धत वापरण्यात येईल. विधानसभेमध्ये दुसरा ठराव मंजूर केला जाईल की जनगणनेची आकडेवारी आल्यानंतर आपण याची अंमलबजावणी करतो तोपर्यंत स्थगिती देण्यात येईल. एकदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये असं ठराव मंजूर झाला की मग आपल्याला कोर्टात जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि जर का ठराव होऊ द्यायचा नसेल तर ओबीसींचे किमान १०० आमदार विधानसभेत पाठवावे.
महाविकास आघाडी बाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी मधील पक्ष हे आरक्षाबाबत भूमिका घ्यायची टाळत आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना केंद्राकडे बोट देखवते, शरद पवारांची राष्ट्रवादी मणिपूरकडे बोट दाखवते तर काँग्रेस नुसती बघ्याच्या भूमिकेत आहे. महाविकास आघाडी ही लोकसभेसारखीच भुमीका घेईल आणि आपला राजकीय फायदा करून घेईल.
त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे परंतु, ओबीसीच ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असावं त्याचबरोबर, मनोज जरांगे पाटील श्रीमंताचे पुढारी नाहीत. लोकसभेत गरीब मराठ्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे विधानसभेत जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात. मात्र 55 लाख दिलेले सर्टिफिकेट हे चुकीचे आहेत आणि सगळे सोयऱ्यांची संकल्पना देखील चुकीची आहे त्यामुळे याला माझा विरोधच असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.