लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या राजू पारवे यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली… त्यावेळी राजू पारवे यांना काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी मदत केली होती. आता लोकसभेला ज्या स्थानिक नेत्यांनी मदत केली होती त्यांच्याविरुद्ध पक्षाने मोठी कारवाई केलीय… कोणा कोणाला निलंबित करण्यात आलंय? याबरोबरच आता लोकसभेला ज्यांनी बंडखोरी करत पक्षांविरोधात काम केलं त्यांच्या विरोधतात काँगेसनं कारवाई केल्यानं विधान परिषद निवडणुकीवेळी ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्याविरोधात काय कारवाई होणार? ती कधी होणार? याविषयी जोरात चर्चा सुरु झालीय… यासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अधिक जाणून घेऊयात…
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी लोकसभेला तिकीट मिळालं नाही म्हणून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली.. पण काँग्रेसने राजू पारवे यांच्या विरोधात श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. आणि काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी राजू पारवे यांचा ७६,७६८ मतांनी पराभव केला त्यामुळं राजू पारवे यांचं खासदार व्हायचं स्वप्न भंगलं… या निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पारवे यांना मदत केल्याचा आरोप झाला होता… त्यासंदर्भातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल येताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कुही शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष विलास राघोर्ते, नगरपरिषद अध्यक्ष हर्षा इंदूरकर, उपाध्यक्ष अमित ठाकरे, नगरसेवक रुपेश मेश्राम, मयूर तळेकर, निशा घुमरे या ६ पदाधिकाऱ्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलंय… काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात घेतलेली भूमिका कुही शहरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चांगलीच अंगलट आली.