राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून जो मतदारसंघ आपल्या वाट्याला येऊ शकतो अशा मतदारसंघात उमेदवार घोषित केले जात आहेत. कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात देखील असं चित्र पाहायला मिळतं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल दौऱ्यामध्ये थेट हसन मुश्रीफ यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले समरजितसिंह घाटगे हे नाराज होण्याची शक्यता आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील युतीधर्मामुळे भाजपला ही जागा मिळू शकली नाही आणि यावेळी देखील तशीच परिस्थिती उद्भवल्याचं चित्र आहे. याचा फायदा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस साधणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नाराज समरजितसिंह घाटगे यांच्याशी शरद पवार यांच्या पक्षाकडून दोन वेळा संपर्क साधला असल्याची माहीती समोर आली होती. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर आता तुतारी हा पर्याय असू शकतॊ का? त्यांचे कट्टर राजकीय विरोधक हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ते तुतारी फुंकण्याची शक्यता किती आहे ? घाटगे शरद पवार यांच्या पक्षात का जाऊ शकतात? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.