२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आली आणि तेंव्हापासून काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली…. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही तेच दिसलं… पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उभारी देणारं यश महाराष्ट्रात मिळालं. आणि काँग्रेसचा आत्मविश्वास वाढल्यामुळे विधानसभेला देखील आपण जास्तीत जास्त जागा जिंकू शकतो असा विश्वास आता त्यांना वाटू लागला आहे. या विश्र्वासामुळे विधानसभेला देखील जास्त जागांवर विजय मिळवता यावा यासाठी काँग्रेसनं मास्टर प्लॅन आखला आहे. काँग्रेसने ४ नेत्यांवर विधानसभेच्या विजयाची जबाबदारी सोपवली आहे… आता हे ४ नेते कोण आहेत आणि या ४ नेत्यांवर काँग्रेसने कोणती जबाबदारी सोपवली आहे? आणि हा मास्टर प्लॅन नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…
महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदार संघा पैकी महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने १७ जागा लढवल्या. आणि त्यातल्या १३ जागांवर विजय मिळवला. आता काँग्रेसला विधानसभेत देखील पुन्हा असच कमबॅक करायचं आहे. यासाठी काँग्रेसने ४ नेत्यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे हे चार नेते काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाची स्क्रिप्ट लिहणार आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या चार नेत्यांमध्ये मधुसूदन मिस्त्री, शशिकांत सेंथिल, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्निथल्ला यांचा समावेश आहे. या चार मधल्या तीन नेत्यांनी याआधीही काँग्रेसच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे.