अवघ्या काही महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने विनोद तावडे यांचं नाव समोर आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजपचा पक्ष विस्तारासाठी भर असल्याचं दिसून येत आहे.
भाजप सदस्यता नोंदणी अभियान सुरू करत आहे, याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत तावडेंवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदी आता कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतची निवड प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. बैठकीच्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.