छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगरमधील रामा हॉटेलमध्ये मुक्काम होता. त्या हॉटेलच्या बाहेर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात होत असलेल्या स्त्रियांच्या अत्याचार तसेच बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे बोलत आहेत परंतु, दिशा सालियन प्रकरणावर देखील आदित्य ठाकरेंनी बोलावं यासाठी भाजपच्या वतीने आंदोलन सुरु होते. त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्या ठिकणी आले. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. पोलिसांकडून कार्यंकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न झाला परंतु, शिवसेनेचे काही कार्यकर्ते थेट पोलिसांच्या अंगावर गेल्याने पोलिसांनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे पोलिसांवर संताप व्यक्त करत याबाबत विचारणा केली. आंदोलनाबाबत माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर एसआयटी नेमली आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाच याबाबत विचारावं.
तसेच या प्रकरणावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे जर खरे असतील तर त्यांनी हॉटेलच्या बाहेर येऊन बोलावं. महाराष्ट्रात होत असलेल्या स्त्रियांच्या अत्याचारावर तसेच बदलापूर प्रकरणावर आदित्य ठाकरे बोलत आहेत, परंतु, दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर का बोलत नाहीत? दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार झाला तसेच या प्रकरणातील आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंच नाव असून ते संशयित आरोपी आहेत. असे गंभीर तसेच बेधक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केले. त्याच बरोबर दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा काय रोल होता असाही सवाल नितेश राणेंनी केला तसेच माझं खोटं वाटत असेल तर मला आणि आदित्य ठाकरेंना चर्चेला समोर घ्यावं आणि मी विचारेल त्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी उत्तरं द्यावी असही नितेश राणे म्हणाले.