विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा संपूर्ण राज्यभर सुरु आहे. आज ही यात्रा होम ग्राउंड बारामतीमध्ये मध्ये आली. जनसन्मान यात्रेनिमित्त बारामतीमधील लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवारांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली होती. मी सकाळी लवकर उठतो,अजित पवार यांच्या भाषणातील वाक्यावरुन सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर खोचक शब्दात टीका केली होती. ‘कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही’. काही लोकांचा एक डायलॉग आहे, मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला. दूधवाला पण उठतो? तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. कारण तिला चहा करायला लागतो. आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत कधी असं भाषण केलं आहे का? अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांनी झोडपून काढलं होतं.
त्यामुळे जनसन्मान यात्रेत बारामतीमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवारांनी नाव घेता सु्प्रिया सुळेंना टोला लगावला. काहीजण म्हणतात दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण आम्ही कुठं म्हणलो की दुधवाला दुपारी उठतो, असे म्हणत अजित पवारांनी प्रत्त्युतर दिलंय. त्याचबरोबर, बांधकामातलं मला चांगलं कळतं, मी इंजिनिअर नसलो तरी इंजिनअरला जेवढं जमणार नाही, तेवढं मला जमतं. त्यामुळे, मी सकाळी सकाळी काही काम पाहण्यासाठी लवकर जात असतो असे अजित पवार यांनी म्हटले. त्याचबरोबर बारामतीच्या विकासावर बोला, पोलिसांचा आदरयुक्त दबदबा बारामतीत असला पाहिजे, कुणी टुकार पणा केला तर पोरांना सांगा दादांनी पोलिसांनी टाईट केलं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा असेल तर सोडणार नाही, आम्ही खऱ्याच्या पाठीशी राहणार. बदलापूर आणि पश्चिम बंगालच्या घटनेवर बोलताना, बदलापूर आणि पश्चिम बंगालमध्ये जे झालं ते होता कामा नये, नराधमांना फाशी दिली पाहिजे. त्यांचे कटिंग केलं पाहिजे, अशा शब्दांत अजित पवार यांनी दोन्ही घटनेवर संताप व्यक्त केला.