विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येईल तशा राज्यातील घडामोडींना ही मोठ्या प्रमाणात वेग येऊ लागलाय. सर्वच नेत्यांकडून आप-आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु आहे तसेच विधानसभेची जोरदार तयारी देखील सुरु झालीये. त्याचप्रमाणं गेल्या लोकसभेला अनेक इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने येणाऱ्या विधानसभेला मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक राजकीय नेत्यांनी आता कंबर कसलेली दिसत आहे. त्यातच सावंतवाडी विधानसभेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी यंदाची २०२४ विधानसभा निवडणूक ही आव्हानात्मक ठरणार आहे. यंदा सावंतवाडीमधून दीपक केसरकर यांचासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना तसेच भाजपचे देखील आव्हान असणार आहे. नेमका विषय काय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून,