मुंबई | भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गणेश मोहन कराड यांची निवड प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे नियुक्तीपत्र देऊन केली. कराड हे करमाळा तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवासी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मीडिया या टीमच्या माध्यमातून सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी नुकताच करमाळा तालुका संवाद दौरा पूर्ण केला असून रिटेवाडी उपसा सिंचन योजना,उजनी जलाशयात भीमा नदीवर गोयेगाव आगोती दरम्यान पूल बांधणे याबरोबर तालुक्यातील स्थानिक विषय यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. या निवडी नंतर सर्व समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही कराड यांनी बोलताना दिली. त्यांच्या निवडी बद्दल करमाळा तालुक्यातून स्वागत होत आहे.