राजेश शहा यांची सलग दहाव्यांदा निवड
पुणे | फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई (फॅम) संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार व माजी अध्यक्ष राजेश शहा यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांची ही शिखर संघटना आहे. नहार हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर या संस्थेवर कार्यकारिणी सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. दि पूना मर्चेंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा यांची फॅम संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी सलग दहाव्यांदा निवड झालेली आहे. शहा अनेक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत, अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी दिली.