पुणे | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे लक्ष कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकीवर आहे. कसबा आणि चिंचवड आमदारांच्या निधनानंतर तातडीने पोटनिवडणूक जाहीर करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी चांगलाच समाचार घेतला.
मते कमी होतील म्हणून लगेच निवडणुका घेतल्या, मग मागील एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी नाही. प्रशासन शहराचे वाटोळे करत आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत, असा वसंत मोरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. महापालिका निवडणुका कधी घेणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, दिवंगत आमदारांच्या सरणाची राख अजून निवली सुद्धा नाही, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या-त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. निधी नसल्यामुळे नागरिकांना चेहरा दाखवावा वाटत नाही. पुण्यातील आमदार,खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे जर कोणत्या पक्षाला सहानुभूती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण, जो मनातून हरतो तो रणात काय जिंकणार, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.