पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळाली. अत्यंत चुरशीची लढत या दोन्ही मतदार संघांमध्ये झाली. आज अखेर या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. कसब्यातील मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11040 मत मिळवून विजयी झाले आहे.
कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे काही नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपकडून मोठी ताकद प्रचारासाठी लावण्यात आली होती.
तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होत. तर दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार देखील करण्यात आला होता. दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका महत्वाच्या होत्या.