भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. पण समोर जी माहिती येत आहे त्यानुसार ५० ते १०० ग्रॅम वजन जास्त आल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेशचा अंतिम सामना अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिल्डब्रँड बरोबर होणार होता. मात्र काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र केलं गेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकच प्रश्न पडला की ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंसाठी इतके कठोर नियम असतात का? ऑलिम्पिकमध्ये काही ग्रॅम जास्त वजन चालत नाही का? तर याच प्रश्नांसंबंधी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.