मुंबई | देशभरात काँग्रेसकडून ‘भारत जोडो यात्रा’ काढली जात आहे. या यात्रेची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचीदेखील चर्चा आहे. त्यातच त्यांच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. औरंगाबादमधील रमेश पाटील नावाच्या एका व्यक्तीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना फोन करून राहुल गांधी यांच्या लग्नाविषयी विचारणा करत चिंता व्यक्त केली. राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ऐवजी पहिले ‘घर जोडो अभियान’ हाती घ्यावे, असे फोनवरून त्याने थोरात यांना सांगितले.
राहुल गांधी यांचे अविवाहित असणे यावर अनेकांनी भाष्य केले होते. पण आता रमेश पाटील या व्यक्तीने बाळासाहेब थोरात यांना फोन केला. त्यामध्ये त्यांनी सामान्यांना ‘भारत जोडो’ यात्रा आवडत आहे. पण आता राहुल गांधी साहेबांचे लग्न झाले पाहिजे. त्यांनी ‘भारत जोडो’ऐवजी पहिले ‘घर जोडो अभियान’ हाती घेतले पाहिजे, असे रमेश पाटील यांनी म्हटले आहे. इतकेच नाहीतर राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाची बायको करावी, पण आता त्यांनी लग्न करावे. बायकोचा अनुभव त्यांनाही आला पाहिजे. बायको कशी असते त्यांनाही समजलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
मीदेखील राहुल गांधींप्रमाणे बेरोजगार
मीदेखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे बेरोजगार आहे. मला माझे आई-वडील सांभाळतात. राहुल गांधी बेरोजगार आहेत, तसा मीपण बेरोजगार आहे. मला पक्षाशी काहीही देणंघेणं नाही. पण किमान यावर्षी तरी राहुल गांधी यांचं लग्न होईल का? असा सवाल रमेश पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना केला. राहुल गांधी आता 50 वर्षांचे आहेत. नंतर त्यांना बायकोही मिळणार नाही, असे सांगायलाही तो विसरला नाही.