मुंबई | फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)च्या दि. २० मार्च रोजी झालेल्या बैठकीत सन २०२३-२०२५ साठी वरिष्ठ उपाध्यक्षपदी राजेश शहा यांची फेरनिवड करण्यात आली.
फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) ही महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी संघटनांची शिखर संघटना आहे. राजेश शहा हे सन १९९१ पासुन फामच्या कार्यकारणीवर असुन सन २००५ पासून ते वरिष्ठ उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. फामच्या माध्यमातून व्यापार व व्यापाऱ्यांना भेडसवणाऱ्या अनेक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सलग ९ व्या वेळेस झालेली फेरनिवड ही राजेश शहा यांच्या कार्याची व त्यांच्यावर व्यापाऱ्यांच्या असलेल्या विश्वासाची पावतीच आहे.
राजेश शहा यांचा शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व व्यापार क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. आर. सी. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि दि पूना गुजराती केळवाणी मंडळाचे चेअरमन, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष, पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी, जनसेवा फाऊंडेशनचे खजिनदार तसेच पूना हॉस्पिटल, श्री.महावीर जैन विद्यालय, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे ट्रस्टी यासह अनेक संस्थांच्या विविध पदांवर ते कार्यरत आहेत. त्याबरोबरच राजेश शहा यांनी दि पूना मर्चंट्स चेंबरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात चेंबरचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वीरीत्या कामकाज पहिले आहे.
आज मुंबई येथे फामचे नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०२३-२०२५ साठी राजेश शहा यांची सर्वानुमते वरिष्ठ उपाध्यक्षपदी ही फेरनिवड केली अशी माहीती जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा यांनी दिली.