नवी दिल्ली | ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (Staff Selection Commission) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आज (दि.8) संपत आहे. त्यामुळे ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना आजचा दिवस मिळणार आहे. ज्या उमेदवारांना ही परीक्षा देण्याची इच्छा असेल त्यांनी आजच रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ssc.nic.in वरून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
‘एसएससी’च्या अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज दुरूस्तीसाठी 12 आणि 13 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे. सर्व वर्गातील उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये महिला/एससी/एसटी/पीडब्लूडी/ईएसएम उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
असा करा अर्ज…
- सर्वप्रथम ssc.nic.in ला भेट द्या
- त्यानंतर रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा
- पोर्टलवर लॉग-इन केल्यानंतर इच्छुक पद निवडा
- डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फी भरा.
- त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकाल.
‘