बिहार | बिहारमधील बेतिया गावातील एका २२ वर्षीय मुलाला काही दिवसांपूर्वी पोटात दुखू लागल्याने त्याला तातडीने पटना येथील मेडीकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासले असता रिपोर्ट मध्ये स्पष्ट झाले कि, त्याच्या पोटात १४ सेमी (५.५) लांब ग्लास त्याच्या शरीरात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोट दुखणे फारच सामान्य समस्या झाली आहे. काही वेळेला चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला पोटदुखीची समस्या उद्भवते. नुकतेच हे प्रकरण उघडकीस आले आहे हा मुलगा त्याच्या रिपोर्टसह दवाखान्यात गेला असता डॉक्टर त्याचे रिपोर्ट पाहून थक्क झाले.
१० तास चालले ऑपेरेशन
डॉ. इंद्र शेखर कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे ११ डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरीत्या हा स्टीलचा ग्लास त्या मुलाच्या शरीरातून बाहेर काढला आहे. कोलोस्टोमीच्या सह्हाय्याने हे ओपेरेशन करण्यात आले.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हा मुलगा नशेत होता तेव्हा हा ग्लास त्याच्या शरीरामध्ये गेला असावा त्यामुळे त्याला काहीच आठवत नाही.