मुंबई | मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा साखरपुडा तिचा बॉयफ्रेंड विजय पलांडे याच्यासोबत नुकताच पार पडला. साखरपुडा मोठ्या थाटामाठात झाला. अनेक लोकांची उपस्थिती होती. मात्र, याचं विशेष आकर्षण ठरलं बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची हजेरी. मराठी अभिनेत्रीच्या साखरपुड्यात ह्रतिकचे सोहळ्याला उपस्थित राहणे चर्चेचा विषय ठरला आहे.
भाग्यश्री तिचा बॉयफ्रेंड आणि मेकअप आर्टिस्ट विजय पलांडे याला अनेक दिवसांपासून डेट करत होती. याबाबतचे पोस्ट तिने अनेकवेळा सोशल मीडियावर मोकळेपणाने शेअर करत होती. पण आता हे कपल नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. त्यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. त्याची पोस्टही तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी ह्रतिक रोशन त्याच्या गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत हजर होता.
भाग्यश्रीचा पती विजय पलांडे याचे बॉलिवूड कनेक्शन असून, विजय हा बॉलिवूड स्टार ह्रतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट आहे. आपल्या मेकअप आर्टिस्ट सोबत असलेल्या ऋृणानुबंधनामुळे ह्रतिक रोशनने उपस्थिती दर्शवली आहे.
कोण आहे भाग्यश्री ?
भाग्यश्री मोटे ही एक मराठी अभिनेत्री असून, तिने मराठी व्यावसायिक नाटक, मराठी सिनेमे, हिंदी सिनेमे, वेबसीरिज व तेलुगू सिनेमांमध्ये काम केले. ‘प्रेम हे’, ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘जोधा अकबर’ या मालिकांमध्येही ती झळकली आहे.