मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट शिवसेना (Shivsena) हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्हावर निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला ‘मशाल’ हे नवे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मात्र, आता या चिन्हावर समता पक्षाने (Samata Party) धाव घेतली आहे. हे चिन्ह आपले असल्याचा दावा केला.
शिवसेना या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. त्यानंतर ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह देऊ केले. मात्र, याचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यापूर्वीच आता समता पक्षाने यावर दावा केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘१९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगितले आहे. त्यावरून त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
दरम्यान, समता पक्षाने या चिन्हावर दावा केला असल्याने ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोगाकडून बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘मशाल’ नेमकी कोणाची?
देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील समता पक्ष. 1996 मध्ये देशाच्या इतिहासात समता पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना काही प्रमाणत यशही मिळाले होते. या पक्षाला त्यावेळी निवडणूक आयोगाने मशाल हे निवडणूक चिन्ह देऊ केले होते.