मुंबई | शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वेगळे झाले. शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यात आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘संपलेला माणूस’ अशी केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण झाले आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे असो किंवा त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश राणे यांच्याकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे काय करतात, याची मला चिंता नाही. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे. त्यावर जास्त कशाला बोलायचं?’ तसेच नारेबाजीबाबत विचारले असता नितेश राणे यांनी सांगितले की, ‘राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. अशा पद्धतीची घोषणा आणि अशी नाटकं आमच्या महाराष्ट्रात चालणार नाहीत. तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असतील, तर शांततेत करा. हिंदूंना कोणतंही आव्हान द्यायचा प्रयत्न करायचा नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार नाही. नवाब मलिक अल्पसंख्याकमंत्री नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत. ही सगळी नाटकं जे कुणी करत असतील, त्यांना पोलिस शोधून काढतील आणि पुन्हा अशा घोषणा होणार नाहीत, याची काळजी आमचं सरकार घेईल, असेही ते म्हणाले.