नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) ज्येष्ठ नेते आणि खासदार असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा विजय झाला आहे. तर शशी थरूर यांचा पराभव झाला. खर्गे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मते मिळाली.
सोमवारी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला असून, थरूर पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत खर्गे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मते मिळाली. यामध्ये तब्बल 400 मते बाद झाली आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू नेते समजले जातात. कर्नाटकातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक त्यांचे नाव आहे. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने काँग्रेसला येत्या काळात उभारी मिळेल, असे म्हटले जात आहे.