इस्लामाबाद | प्रेम आंधळं असतं असं म्हणतात…कधी कोणाचं कोणावर प्रेम जडेल, याचा काही नेम नाही…अशीच ‘लव्ह स्टोरी’ आहे मालकीन आणि ऑफिसबॉयची…ही मालकीन वर्षाला तब्बल 60 लाख रुपये कमाई करते. इतक्या श्रीमंत असलेल्या महिलेचे ऑफिसबॉयवर प्रेमसंबंध जुळले आणि सुरु झाले त्यांची ‘लव्ह स्टोरी’…या जोडप्याने नंतर लग्नही केले. त्यानंतर आता सुरु झालं त्यांचं वैवाहिक जीवन.
पाकिस्तानात राहणाऱ्या या जोडप्याची ‘लव्ह स्टोरी’ युट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रईस खान हा पेशावर येथील रहिवासी आहे. तर शेरीस ही लाहोरची रहिवासी आहे. त्यांच्या या स्टोरीबाबत युट्यूबर सैयद बासित अली याने या जोडप्याशी संवाद साधला. शेरीसने सांगितले की, रईस ऑफिसबॉय होता. तो ऑफिससंबंधित कामे करत होता. ऑफिसमध्येच तो चहा-नाष्टा आणण्याचे काम करत होता. त्याच्या कामाचा अंदाज मला चांगला वाटत होता. तसेच रईस हा दिसायलाही सुंदर असल्याने मला तो आवडत असे. तो सुरेल गाणीही गातो. मी त्याचा आवाज ऐकून त्याच्या प्रेमातच पडले. सुरुवातीला आमचे नातेवाईक लग्नासाठी तयार नव्हते. मात्र, नंतर त्यांचे कुटुंबिय लग्नासाठी तयार झाले.
रईस खान याने सांगितले की, मला कधीही वाटले नाही, माझी मालकीन माझ्यावर प्रेम करते. मी कामानिमित्त तिला भेटत होतो. मात्र, आमच्यात प्रेमसंबंध जुळल्याने आम्ही दोघांनी लग्न केलं आणि आता सुखी वैवाहिक जीवन व्यतीत करत आहोत.
जेव्हा कुटुंबियांना त्यांच्या या प्रेमप्रकरणाबाबत समजे तेव्हा त्यांनी नकार दर्शवला. नातेवाईकांनी तू इतकी श्रीमंत आहेस. ऑफिसबॉयशी लग्न का करतेस? असा प्रश्न कुटुंबियांकडून केला जात होता. मात्र, शेरीसने रईससोबत लग्न करायचे ठरवले होतेच. अखेर तिने त्याच्यासोबत लग्न केले