मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सासुरवाडीची शाखा होती, ती त्यांनी सांभाळली पाहिजे होती. त्यावर मी जास्त काय बोलणार त्यावर, तो त्यांच्या दोन पक्षातील विषय आहे, असे मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी म्हटले आहे.
शिवसेना कोणाची यावरून ठाकरे (Thackeray) आणि शिंदे (Shinde) यांच्यात निवडणूक आयोगामध्ये वाद सुरू आहेत. या प्रकरणाची सुनावणी आयोगामध्ये सुरू असली तरी दोन्ही गटांमध्ये रस्त्यावरही वाद सुरू आहेत. डोंबिवलीमध्ये शिवसेना शाखेवरून ठाकरे-शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटांमधला वाद चिघळण्याआधीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाने डोंबिवलीच्या शिवसेना शाखेवर अधिकृत ताबा घेतला. त्यावर आता मनसेचे आमदार पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत टीका केली.