इस्लामाबाद | ‘प्रेम आंधळं असतं’ असे म्हटले जाते…असाच प्रकार पाकिस्तानात पाहिला मिळाला. 20 वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्यावेळी तिचे 52 वर्षीय शिक्षकावर प्रेम जडले. या दोघांमध्ये तब्बल 32 वर्षांचे अंतर. तरीही या जोडप्याने कोणाचाही विचार न करता प्रेमविवाह केला. आता याचीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
20 वर्षीय जोया नूर हिचे 52 वर्षीय साजिद अली या शिक्षकावर प्रेम जडले होते. जोया ही महाविद्यालयात बी. कॉम.चे शिक्षण घेत होती. तर साजिद हा तिथं शिक्षक होता. जोयाला साजिदचा लूक आणि पर्सनालिटी आवडत होती. त्यामुळे ती साजिदवर प्रेम करू लागली. एक मुलाखतीत जोयाने माहिती दिली. ती म्हणाली, सुरुवातीला साजिद माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. मात्र, एक दिवस मी साजिदकडे प्रेम व्यक्त करून लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
जोयाने दिलेल्या लग्नाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी साजिदने एक आठवड्याचा कालावधी मागितला होता. याच एका आठवड्यात दोघांमध्ये जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.