मुंबई | शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वेगळा झाला. शिवसेनेतून बाहेर पडताना त्यांच्यासोबत सेनेचे खासदार, आमदारही गेले. त्याकाळात ते गुवाहटीला गेले होते. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हेदेखील गेले होते. त्यानंतर आता बच्चू कडूंनी याबाबत भाष्य केले. ‘मी गुवाहाटीला जाऊ नये असं बऱ्याच लोकांना वाटत होते. मला परत यायचं होतं पण आलेला माणूस जावू द्यायचा नाही, अशी ती वेळ होती. त्याला पर्याय नव्हता, असेही ते कडू म्हणाले.
बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या शेजारचे लोक, अधिकारी होते ते काम करत नव्हते. दिव्यांगाबाबत दीड वर्षे बैठकही लावली नव्हती. उद्धव ठाकरेंबद्दल आस्था आहे. परंतु, ते ‘मातोश्री’वर जेवढे मजबूत होते तेवढे ‘वर्षा’वर नव्हते. सत्तेत गेल्यावर काही महत्त्वाचे विषय मार्गी लागणं गरजेचे असते पण ते झाले नाही. ही बाब मनाला खटकत होती. त्याचसोबत मी एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
दरम्यान, आम्ही गुवाहाटीत गेल्यानंतर आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आम्ही काहीतरी वाईट करून आलो असं वाटायला लागलं. मला परत यायचं होतं पण आलेला माणूस जाऊन द्यायचा नाही, अशी ती वेळ होती. त्याला पर्याय नव्हता, असेही ते म्हणाले.