मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून छगन भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.
दरम्यान, भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन भुजबळ यांच्याकडून करण्यात आले आहे. भुजबळांवर डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.