शिमला | गुजरात, हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहे. त्यापूर्वीच हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसच्या सुमारे 26 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur) यांनी ट्विट करून दिली.
राज्यात मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकांमध्ये राज्यात आपली छाप सोडत भाजपच्या सत्तेला आव्हान देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या काँग्रेसला खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर पुढील महिन्यात 12 डिसेंबर रोजी मतमोजणी नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधीच राजकीय वातावरण तापले आहे.