पुणे | जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) च्या रेस्ट ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी अजित सेठिया यांची तर, मुख्य सचिवपदी आदेश खिंवसरा यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड २०२२ ते २०२४ या कालावधीसाठी आहे.
जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष – अजित सेठिया (पुणे), उपाध्यक्ष – पंकज कर्नावट (पुणे), मुख्य सचिव – आदेश खिवंसरा (पुणे) , खजिनदार – कमलेश कोठारी (नाशिक), सचिव – अमित मुथा (अहमदनगर) लेडीज विंग कन्वेनर – वैशाली छाजेड (पुणे), युथ कन्वेनर – गौरव नहार (पुणे)
जीतो संस्थेच्या भारतात ६४ आणि परदेशात ११ शाखा आहेत. रेस्ट ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, जळगाव, मालेगाव, अहमदनगर या शाखांचा समावेश आहे.
जीतो संस्था उद्योग-व्यवसाय, शिक्षण, सेवा क्षेत्रामध्ये जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते.