नवी दिल्ली | जगभरात व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातच WhatsApp युजर्सला नवनवीन फिचर्स देण्याचा प्रयत्न असतो. आता WhatsApp कडून भन्नाट फिचर आणलं गेलंय.
WA BetaInfo च्या अहवालानुसार, WhatsApp डेस्कटॉप युजर्स आता अॅपमधूनच Call History ट्रॅक करू शकतात. WA BetaInfo ने व्हॉट्सअॅपमध्ये या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. WhatsApp च्या डेस्कटॉप अॅपमध्ये आणखी एक नवीन फीचर लवकरच येणार आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर युजर्सना ग्रुप चॅटमध्ये सदस्यांच्या नावाऐवजी त्यांचा फोटो दिसेल.
WA BetaInfo नुसार, WhatsApp डेस्कटॉप बीटा व्हर्जन २.२२४५.३ युजर्सना हे फीचर मिळत आहे. या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स ग्रुप मेंबर्सना सहज ओळखू शकतील, ज्यांचे नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह नाहीत. डेस्कटॉप बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर कंपनी हे फीचर Android साठी देखील रोलआउट करू शकते.