मुंबई | महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची एक वेगळीच ओळख आहे. त्यांची व्यक्तिरेखा, त्यांचा आवाज काही जण अगदी सहजपणे कॉपी करतात. पण हे करताना आता जरा जपूनच…कारण अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एका याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या परवानगी विना त्यांचं नाव, आवाज वापरू नये, असे म्हटले आहे.
सध्या अमिताभ बच्चन यांची मिमिक्री अनेक कलाकारांकडून केली जाते. मग ते सार्वजनिक कार्यक्रमात असो किंवा टीव्हीवरील जाहिरातींमध्ये. अशा अनेक ठिकाणी अमिताभ बच्चन यांची मिमिक्री होत असल्याचे पाहिले असेल. या अशा विना परवानगी कॉपी करण्याला खुद्द अमिताभ बच्चन यांचाच विरोध आहे. त्यानुसार, त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
त्यांच्या याचिकेनंतर न्यायालयाने ज्या फोनवरून बच्चन यांचे नाव, आवाजाचा वापर केला जातो, अशा मोबाईल नंबरची माहिती टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरना देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या पर्सनॅलिटीला धोका पोहोचवत आहेत, अशा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सला ऑनलाईन लिंक्स हटवण्याचे आदेशही दिले आहेत.