मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेमध्ये मूर्खांचा बाजार भरला आहे. त्यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत. त्यामुळे चांगली लोकं हळूहळू दूर जातील, अशी टीका शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली.
शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आणि काही खासदार फोडले आहेत. त्यावरून राजकारणात एकच चर्चा सुरु असताना आता प्रतापराव जाधव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मूर्खांचा बाजार भरला आहे. त्यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत. त्यामुळे चांगली लोकं हळूहळू दूर जातील”.
दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेसह विरोधकांकडून सत्ताधारी फडणवीस-शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेत मूर्खांचा बाजार असल्याचे म्हटले आहे.