नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यात लसीकरणावर विशेष भर देण्यात आला होता. मात्र, या लसीकरणानंतर काही रुग्ण दगावले होते. त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना लसीकरणाने झालेल्या मृत्यूला सरकार जबाबदार नसल्याचे केंद्राकडून न्यायालयात सांगण्यात आले.
कोरोना काळात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर उपाय म्हणून भारतासह जगभरात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, याच लसीकरणाने काही रुग्णांना त्रास झाला तर काही रुग्ण दगावले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात लसीकरणानंतर दगावलेल्या रुग्णांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
काय आहे प्रकरण?
दोन तरुणींचा लसीकरणानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे.