मुंबई : जर बँकेतून कर्ज काढायचे असेल तर आपल्याला त्याची परतफेड करताना हफ्ता ठरवून दिला जातो. त्यासाठी ठराविक रक्कम नियोजित केली जाते. पण आता आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्जदारांचा हफ्ता वाढणार आहे.
रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर महिन्यात 0.50 टक्के व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे अनेक कर्जावरील हफ्ता वाढला आहे. त्यात आता आयसीआयसीआय बँकेचे एमसीएलआरवर आधारित सर्व व्याजदर 1 डिसेंबरपासून महाग झाले आहेत. बँकेने एमसीएलआरच्या दरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या निर्णयानंतर एमसीएलआरवर आधारित सर्व कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत.
दरम्यान, या वाढीव व्याजदराचा फटका असंख्य कर्जदारांना होणार आहे. परिणामी, आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.