मुंबई | शिवाजी महाराज यांनी वेळप्रसंगी ‘गनिमी कावा’ केला होता. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील वापरला आहे, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेतेमंडळींकडून आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. त्यात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची भर पडली आहे. कारण संजय गायकडवाड यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे, यात काहीही दुमत नाही. पण एकनाथ शिंदे हे बेइमान व्यक्ती नाहीत. शिवाजी महाराजांनी वेळप्रसंगी गनिमी कावा केला होता. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनी देखील वापरला आहे, असे ते म्हणाले.
तसेच याआधी ज्या नेत्यांनी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली आहे. त्यामुळे ही लोकं पुन्हा असं काही बोलतील, असे वाटत नाही, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.