नवी दिल्ली | आपण जेव्हा कधी विमानातून प्रवास करतो तेव्हा आपल्याला मोबाईलमधील Airplane Mode किंवा Flight Mode ऑन करावा लागतो. असे केल्याने आपला नेटवर्कशी संपर्क पूर्णपणे तुटतो. मात्र, तुम्हाला आता हा पर्याय सुरु करण्याची गरज भासणार नाही. आपण विमान प्रवासात देखील मोबाईलवरून इतरांशी संपर्क साधू शकतो.
बस, कार किंवा ट्रेनमधून जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण हव्या त्या व्यक्तीशी संपर्क करू शकतो. मात्र, विमानातून प्रवास करताना असे करता येत नव्हते. कारण विमानातून प्रवास करताना फोनमधील Flight Mode हा पर्याय सुरु ठेवावा लागतो. असे केल्याने मोबाईलमधील नेटवर्क कनेक्टिव्हिटी पूर्णपणे बंद होते आणि आपल्याला कोणाशीही संपर्क साधता येऊ शकत नाही. मात्र, आता विमान प्रवासातही मोबाईलचा वापर करता येऊ शकणार आहे. अशी माहिती युरोपियन कमिशनकडून देण्यात आली आहे.
त्यानुसार, Flight Mode चा नियम काढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय विमानांसाठी 5G फ्रिक्वेन्सी बँड 30 जून 2023 पर्यंत उपलब्ध करुन देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना मोबाईलचा पुरेपुर वापर करता येणार आहे. याचा फायदा विमानातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना होणार आहे.