सोलापूर | सोलापुरात एक विवाह सोहळा झाला आणि त्याचीच चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. याचं कारण म्हणजे दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी केलेला विवाह. पण या विवाहावरून एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली असून, नवविवाहित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आहेत. दोघीही आयटी इंजिनिअर असून, मुंबईत राहतात. त्यांनी कुटुंबियांच्या परवानगीने अतुल नावाच्या एकाच तरुणाशी विवाह केला. या विवाहाची चर्चा सुरु असतानाच अकलूज पोलिस ठाण्यात वराविरोधात तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. कारण हिंदू मॅरेज अॅक्टनुसार, वधू किंवा वर जिवंत असताना दुसरे लग्न करणे अवैध ठरते. याचाच आधार घेत या विवाहावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भा.दं.वि. कलम 494 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, हा विवाह अवैध ठरू शकतो. असे करणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगावी लागू शकते.