मुंबई | सम्राट पृथ्वीराजनंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा महापुरुषांच्या वेशात आला. यावेळी तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारचा शिवरायांच्या वेशभूषेतील फोटो पाहून चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
अक्षय कुमार सफेद कुर्ता, पायजमा व दाढी या लूकमध्ये चाहत्यांच्या समोर आला आहे. चाहत्यांनी अक्षयचा हा लूक पाहून त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. चाहत्यांनी शरद केळकर यांचा फोटो ट्वविट करून अक्षयची खिल्ली उडवली आहे.अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओखाली कमेंट करत शरद केळकरसारखा या भूमिकेत कोणीच नाही, असे म्हणत ट्रोल केले आहे.