पुणे | जयराज ग्रुपच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘जयराज शिष्यवृत्ती’चे आज वितरण करण्यात आले. पुणे शहरातील कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतच्या सदस्यांच्या इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ७५% च्या पुढे गुण मिळविलेल्या मुलांना ‘जयराज शिष्यवृत्ती’ देण्यात येते. यावर्षी २० विद्यार्थ्यांना रु. ५०००/- धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
जयराज ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजातील गरजूंसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी शिबीर इत्यादी बाबींचा समावेश आहे. त्याअंतर्गतच हा शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे चे प्रशासक मधुकांत गरड, पूना हॉस्पिटलचे विश्वस्त नैनेश नंदू, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या अध्यक्षा नमिता नाईक, जयराज ग्रुपचे राजेश शहा व धवल शहा, आडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, माथाडी हमाल पंचायतचे गोरख मेंगडे, विवेक कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे नितीन नाईक, मिलिंद कुलकर्णी, पूना मर्चंट चेंबर चे उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, दिपक बोरा, सचिन नहार, नितीन नहार, दिलीप रायसोनी आदि मान्यवर उपस्थित होते.
मेघा मोरे, देवशाला कसबे, प्रज्ञा चक्रे, वैष्णवी मगर, करीना जैस्वाल, नंदिनी जोगदंड, गौरव म्हस्के, मनीषा जाधव, शिवानी शिंदे, साक्षी जाधव, आंचल नाडे, डेव्हिड केदारी, रुपाली कांबळे, नाजिया शेख, यास्मिन सय्यद, कुणाल मगर, सानिया शेख, पायल गवळी, शिवम ओव्हाळ, कल्याणी कांबळे या विद्यार्थांना शिष्यवृती प्रदान करण्यात आली.
मधुकांत गरड म्हणाले की, ही शिष्यवृती दहावीच्या परीक्षेत नुकतेच यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांना त्यांचा पुढील शिक्षणास सहाय्यभूत व प्रेरणादायी ठरणार आहे.
राजेंद्र बाठिया म्हणाले की, सर्वसामान्य तळागाळातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जयराज ग्रुपने सुरु केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल राजेश शहा व धवल शहा यांचे कौतुक आहे. राजेश शहा यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.